iPhone 14 ची किंमत झाली कमी, पटकन करा खरेदी

Manish Jadhav

IPhone

आयफोन सध्या देशातील सर्वाधिक मागणी असलेला स्मार्टफोन बनला आहे. तथापि, हा फोन बराच महाग आहे आणि प्रत्येकजण तो खरेदी करु शकत नाही.

iPhone 14 | Dainik Gomantak

iPhone 15

नवीन iPhone 15 ची किंमत 79,900 रुपयांपासून सुरु होते परंतु हा फोन सध्या Amazon वर केवळ 70,500 रुपयांना उपलब्ध आहे.

iPhone 14 | Dainik Gomantak

iPhone 14

जर तुम्ही पहिल्यांदाच आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल परंतु तुमच्याकडे लेटेस्ट आयफोन 15 खरेदी करण्याचे बजेट नसेल, तर तुम्ही आता आयफोन 14 देखील खरेदी करु शकता कारण फोन अतिशय स्वस्त किंमतीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहे.

iPhone 14 | Dainik Gomantak

iPhone 14 ची किंमत

Amazon च्या ग्रेट समर सेलमध्ये, iPhone 14 सध्या अतिशय स्वस्तात उपलब्ध आहे. फोनची एक्चुअल प्राइस 79,900 रुपये आहे पण त्यावर 26 टक्के सूट दिली जात आहे आणि त्याची किंमत 58,999 रुपये झाली आहे.

iPhone 14 | Dainik Gomantak

Amazon च्या ग्रेट सेलमध्ये ऑफर

तुम्ही iPhone 12 किंवा iPhone 13 वर अपग्रेड करत असल्यास, तुम्ही तुमच्या जुन्या डिव्हाइसची किंमत आणखी कमी करण्यासाठी एक्सचेंज देखील करु शकता.

iPhone 14 | Dainik Gomantak

आयफोन 14 ची सीरीज

आयफोन 14 भारतात 2022 मध्ये लॉन्च झाला होता. या लाइनअपमध्ये कंपनीने iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लॉन्च केले होते.

iPhone 14 | Dainik Gomantak

आयफोन 14 आणि आयफोन 13 फिचर्स

आयफोन 14 आणि आयफोन 13 चे सारखेच फिचर्स असले तरी, आयफोन 14 प्रो मॉडेलमध्ये सुधारित प्रोसेसर आणि डायनॅमिक आयलँड नॉच डिझाइनसारखे मोठे बदल दिसतात.

iPhone 14 | Dainik Gomantak

आयफोन 14 ची खासियत

आयफोन 14 बद्दल बोलायचे झाल्यास, आयफोन 13 च्या तुलनेत कॅमेरामध्ये काही अपग्रेड्स मिळतात. फ्रंट कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, iPhone 13 आणि iPhone 14 दोन्ही 12 मेगापिक्सेल कॅमेरासह येतात. सध्या आयफोन 14 हा फोन अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्ही तो खरेदी करु शकता.

iPhone 14 | Dainik Gomantak
Amitabh Bachchan | Dainik Gomantak