Manish Jadhav
iQOO चा फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 15 भारतात 26 नोव्हेंबर रोजी लॉन्च होणार आहे.
हा फोन क्वालकॉमच्या नवीन Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसरने सुसज्ज असेल.
iQOO 15 हा Android 16 वर आधारित OriginOS 6 वर चालेल.
यात 6.85 इंच 2K Samsung M14 AMOLED डिस्प्ले मिळेल, ज्याचा रिफ्रेश रेट 144 Hz असेल आणि तो स्मूथ गेमिंग अनुभव देईल.
फोनमध्ये मोठी 7000 mAh बॅटरी दिली जाईल, जी 100W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंग ला सपोर्ट करेल.
यात ट्रिपल रिअर कॅमेरा (Triple Rear Camera) सेटअप असेल, ज्यात 50 MP चा मेन लेन्स, 50 MP चा पेरिस्कोप टेलीफोटो आणि 50 MP चा अल्ट्रावाइड सेन्सर असेल.
फोनमध्ये 16 GB LPDDR5X रॅम आणि 1 TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेज मिळेल. तसेच, ब्लूटूथ 6 आणि वाय-फाय 7 कनेक्टिव्हिटी असेल.
iQOO 15 ची भारतीय बाजारात OnePlus 15 आणि Xiaomi 15 Ultra सारख्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सशी स्पर्धा असेल.