IPL Top 5 Records: आयपीएलमधील 'हे' 5 अशक्यप्राय रेकॉर्ड तुम्हाला माहितीयेत का?

Manish Jadhav

आयपीएल 2025

इंडियन प्रीमियर लीग 2025 ची सुरुवात उद्या (22 मार्च) पासून सुरु होणार आहे. या 18व्या हंगामाचा अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे. ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) यांच्यात उद्घाटन सामना खेळला जाईल.

Virat Kohli | Dainik Gomantak

आयपीएल विक्रम

आयपीएल 2025 च्या हंगामात, या 10 संघांमध्ये 65 दिवसांत अंतिम सामन्यासह एकूण 74 सामने खेळवले जातील. आयपीएलचा इतिहास जितका रंजक आहे तितकाच तो विक्रमांनी भरलेला आहे असे म्हणता येईल. पहिल्या हंगामापासून ते 17व्या हंगामापर्यंत अनेक मोठे विक्रम जोडले गेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया यातील 5 खास आणि मोठ्या विक्रमांबद्दल...

Virat Kohli | Dainik Gomantak

1. कोहलीचा रेकॉर्ड

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) चा माजी कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमध्ये असा विक्रम रचला आहे की, त्याच्या या विक्रमाजवळ जाणेही अशक्य आहे. हा विक्रम गेल्या 9 वर्षांपासून कोणत्याही खेळाडूला मोडता आलेला नाही. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर आहे.

Virat Kohli | Dainik Gomantak

2. कोहली-डिव्हिलियर्स भागीदारी

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी आरसीबीकडून खेळताना केला होता. 2016 च्या हंगामात दोघांनीही गुजरात लायन्सविरुद्धच्या सामन्यात शानदार फलंदाजी केली होती. त्यांनी मिळून 229 धावा जोडल्या होत्या. या सामन्यात कोहली आणि डिव्हिलियर्स दोघांनीही शतके ठोकली होती.

Kohli-de Villiers | Dainik Gomantak

3.जलद शतक

2013च्या आयपीएल हंगामात ख्रिस गेल आरसीबीचा भाग होता. त्याने पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात 30 चेंडूत शतक झळकावले होते. हे आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर डेव्हिड मिलर आहे, ज्याने 2013 च्या त्याच हंगामात पंजाब किंग्जकडून खेळताना आरसीबीविरुद्ध 38 चेंडूत शतक झळकावले होते.

Chris Gayle | Dainik Gomantak

4.जलद फिफ्टी

आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतकाचा विक्रम राजस्थान रॉयल्स (RR) चा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे. 11 मे 2013 रोजी, त्याने कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्धच्या सामन्यात 13 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. हा सामना ईडन गार्डन्समध्ये झाला होता. यशस्वीने अर्धशतक साजरे करताना 6 चौकार आणि 3 षटकार मारले होते.

Yashasvi Jaiswal | Dainik Gomantak

5. षटकारांचा विक्रम

ख्रिस गेलने आणखी एक विक्रम रचला आहे, जो मोडण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. 2013 च्या हंगामात, गेलने आरसीबीकडून खेळताना एका सामन्यात 17 षटकार मारले होते. पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 175 धावांची खेळी खेळून ही कामगिरी केली होती. एका डावात कोणत्याही फलंदाजाने मारलेले हे सर्वाधिक षटकार होते.

Chris Gayle | Dainik Gomantak
आणखी बघा