Manish Jadhav
आयपीएल 2025 साठीचा दोन दिवसीय मेगा लिलाव जेद्दाह, सौदी अरेबियामध्ये पार पडला. लिलावादरम्यान सगळ्या क्रिकेटप्रेमींचे एका नावाकडे लक्ष लागले होते. ते नाव होते अर्जुन तेंडुलकर.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा लेक अर्जुन तेंडुलकर गोव्याकडून खेळतो. जेव्हा आयपीएल लिलावादरम्यान अर्जुनचे नाव समोर आले तेव्हा कोणत्याच टीमने त्याला पहिल्यांदा घेतले नाही.
अगदी शेवटच्या क्षणी मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळत अर्जुनला 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी करत आपल्या संघाचा भाग बनवले.
यंदाच्या आयपीएल हंगामात अर्जुनने त्याच्या गोलंदाजीचा जलवा दाखवून द्यावा अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. अर्जुना तू करुनच दाखव असे चाहते म्हणत आहे.
अर्जुनने रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व केले होते, जिथे गेल्या 3 सामन्यात त्याने 10 विकेट्स घेतल्या होत्या. रणजीमध्ये त्याने गोलंदाजीच्या माध्यमातून छाप सोडली होती.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अर्जुनला सुवर्णसंधी होती, पण विशेष कामगिरी करण्यात तो अपयशी ठरला. अपेक्षेच्या विरुद्ध अर्जुनने या स्पर्धेत महागडा स्पेल टाकला. त्याने 4 षटकात 48 धावा दिल्या होत्या.
हिट मॅनच्या नेतृत्वाखाली पदापर्ण करणाऱ्या अर्जुनने आयपीएलमध्ये 5 सामने खेळले, ज्यात त्याने केवळ 3 विकेट्स घेतल्या होत्या.