Manish Jadhav
आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामना शुक्रवारी (18 एप्रिल) बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 6-6 सामने खेळले असून त्यापैकी 4-4 सामने जिंकले आहेत.
विराट आणि अर्शदीप सिंग दोघांसाठीही हा सामना खूप महत्त्वाचा असून त्यांच्याकडे मोठी कामगिरी करण्याची नामी संधी आहे. आपल्या अफलातून फलंदाजीच्या माध्यमातून विराट या सामन्यात एक मोठा रेकॉर्ड नावावर शकतो.
पंजाब किंग्जविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आहे. त्याने या संघाविरुद्ध 26 सामने खेळले असून 49.30 च्या सरासरीने11134 धावा केल्या आहेत. तर, या यादीत विराट दुसऱ्या स्थानी आहे.
विराटने पंजाब किंग्जविरुद्ध 32.15 सामन्यात 35.51 च्या सरासरीने 1030 धावा केल्या आहेत. जर विराटने येत्या सामन्यात आणखी 105 धावा केल्या तर तो डेव्हिड वॉर्नरला मागे सोडून पहिल्या स्थानी पोहोचेल.
डेव्हिड वॉर्नर– 1134 धावा, विराट कोहली– 1030 धावा, शिखर धवन– 894 धावा, फाफ डूप्लेसिस– 854 धावा, रोहित शर्मा– 848 धावा
आयपीएल 2025 मध्ये आतापर्यंत विराटने शानदार कामगिरी केली आहे. पुढील सामन्यातही त्याने ही कामगिरी अशीच सुरु ठेवली तर तो अनेक मोठ-मोठे रेकॉर्ड मोडू शकतो.