Manish Jadhav
टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहलीच्या शानदार खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (RCB) शनिवारी (22 मार्च) आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ला सात विकेट्सने पराभूत केले.
सलामीवीर विराटने फिल सॉल्टसोबत पहिल्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी करुन संघाला दमदार सुरुवात दिली. यादरम्यान त्याने फक्त 36 चेंडूत 59 धावांची दमदार खेळी खेळली. या खेळीदरम्यानच विराटने एक खास रेकॉर्डही आपल्या नावावर केला.
आरसीबीच्या डावाच्या 11व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराटने एक धाव घेताच त्याने स्पर्धेच्या इतिहासात एक खास विक्रम केला. कोलकाता आता चौथा संघ बनला, ज्याविरुद्ध विराटने एक हजार धावा पूर्ण केल्या.
कोलकाता व्यतिरिक्त, विराटने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज विरुद्धही एका हजार धावा केल्या आहेत.
आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाविरोधात 1000 धावा पूर्ण करणारा विराट एकमेव फलंदाज बनला. गेल्या 17 वर्षांत कोणत्याही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.
गोलंदाजीत RCB ची कमान डावखुरा फिरकी गोलंदाज कृणाल पांड्याने संभाळली. त्याने अजिंक्य रहाणे, व्यकंटेश अय्यर आणि रिंकू सिंह यांना आऊट करत KKR ला मोठा दणका दिला.
KKR ने RCB ला 174 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र, विराट-सॉल्टच्या शानदार खेळीच्या जोरावर आरसीबीने हे लक्ष्य सहज गाठले. या दोघांव्यतिरिक्त कर्णधार रजत पाटीदारने 16 चेंडूत 34 धावांची खेळी खेळली.