Manish Jadhav
आपल्या अनेकांच्या सकाळची सुरुवातच ही चहा चपाती किंवा फोडणीचा भात खाऊन होत असते.
चपाती आणि भात या दोन्ही पदार्थांचे आपापले फायदे आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक आणि फायदेशीर मानले जातात.
हल्ली डाएटचे फॅड खूप वाढत आहे. लोक ठराविक पदार्थ एक विशिष्ट वेळेत खाताना दिसत आहे. यामुळेच भात आणि चपाती खाण्याच्या वेळेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात.
काही लोक रात्री भात खाणे योग्य मानतात तर काही लोक रात्रीच्या जेवणात फक्त चपाती खातात.
आज (22 मार्च) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून भात आणि चपाती मध्ये कुठला पदार्थ रात्रीच्या जेवणात खाणे योग्य आहे ते जाणून घेणार आहोत...
चपातीत मुबलक प्रमाणात फायबर असते ज्यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित राहते. चपातीत प्रोटिन्स मुबलक प्रमाणात असतात.
भात हे हलके अन्न मानले जाते. तांदळात कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात.
चपातीच्या तुलनेत भातामध्ये कमी फायबर आणि प्रोटिन्स असतात, तर कॅलरीज जास्त प्रमाणात असतात.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, रात्रीच्या जेवणात आपण चपाती खाल्ली पाहिजे. याचे कारण म्हणजे चपातीत फायबर्स जास्त प्रमाणात असतात.