IPL 2025: अय्यरची कमाल! कॅप्टन कूल अन् हिट मॅनला मागे टाकत केली खास कामगिरी

Manish Jadhav

श्रेयस अय्यर

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज आयपीएल 2025 मध्ये चमकदार कामगिरी करत आहे.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल

सोमवारी (26 मे) पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव करुन श्रेयसच्या संघाने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

खास रेकॉर्ड

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पंजाबने मुंबईला हरवताच श्रेयसच्या नावावर एक खास रेकॉर्ड नोंदवला गेला.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

सर्वात यशस्वी कर्णधार

आयपीएलमध्ये विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत श्रेयस आता दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला. त्याने कॅप्टन कूल आणि हिट मॅनला मागे सोडले.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

कामगिरी

आतापर्यंत त्याने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये 84 सामने खेळले असून, ज्यामध्ये त्याने संघाला 49 सामने जिंकून दिले तर 33 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्याच्या विजयाची टक्केवारी 58.33 इतकी आहे.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

श्रेयसच्या पुढे कोण?

याबाबतीत श्रेयसच्या पुढे मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि सचिन तेंडुलकर पुढे आहेत, ज्यांच्य विजयाची टक्केवारी अनुक्रमे 58.62 आणि 58.82 टक्के एवढी आहे.

Shreyas Iyer | Dainik Gomantak

उत्तम कर्णधार

या आकडेवारीसह श्रेयसने हे सिद्ध केले की, तो केवळ एक उत्तम फलंदाजच नाही तर एक उत्तम कर्णधार देखील आहे.

Shreyas Iyer | Dainik Gomantak
आणखी बघा