Sameer Amunekar
आयपीएल स्पर्धेला 22 मार्चपासून सुरुवात होणार असून पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे.
आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी संघाचं नाव घेतलं तर मुंबई इंडियन्सचा संघ आघाडीवर आहे.
मुंबई संघांनं 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे, त्यामुळे या संघाला आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मानला जातो.
मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाच्या रेकॉर्डवर नजर टाकली तर रोहित शर्माने सर्वाधिक सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे.
रोहितने एकूण १६३ सामन्यांमध्ये मुंबईचे नेतृत्व केले, त्यापैकी ९१ सामन्यात विजय मिळवला आणि ६८ सामन्यात पराभव पत्करावा लागला.
रोहित शर्मा हा एकमेव कर्णधार आहे ज्याने १०० हून अधिक सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले.