Manish Jadhav
आयपीएल 2025 च्या क्वालिफायर 2 मध्ये रविवारी (1 जून) पंजाब किंग्ज मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 वाजता हा थरार रंगणार आहे.
हा सामना जिंकणारा संघ 3 जून रोजी अंतिम फेरीत थेट आरसीबीशी भिडेल. आजच्या सामन्यात मुंबईचा विस्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवकडे एबी डिव्हिलियर्सचा खास विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे.
यंदाच्या हंगामात सूर्या जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. या हंगामात सूर्या आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने 15 सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 673 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5 अर्धशतके आली आहेत.
आता तो एबी डिव्हिलियर्सचा एक खास विक्रम मोडू शकतो. आयपीएलच्या इतिहासात नॉन-ओपनर फलंदाजाने एका हंगामात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डिव्हिलियर्सच्या नावावर आहे, जो सूर्या आता मोडण्याच्या मार्गावर आहे.
2016 च्या आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना डिव्हिलियर्सने 16 सामन्यांमध्ये 687 धावा केल्या होत्या. डिव्हिलियर्सचा हा विक्रम मोडण्यासाठी सूर्यकुमारला आज पंजाब किंग्जविरुद्ध 15 धावा कराव्या लागतील.
यासह, सूर्या आयपीएलच्या इतिहासात नॉन-ओपनर म्हणून एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.