Sameer Amunekar
तुमचं Gmail स्टोरेज फुल झालं आहे का? मग चिंता करू नका इथे दिलेल्या 5 सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही तुमचं Gmail स्टोरेज सहज रिकामं करू शकता.
Gmail मध्ये larger:10M असा सर्च करा. यामुळे 10MB पेक्षा जास्त साईझ असलेले ईमेल्स दिसतील. हे ईमेल्स पाहा आणि अनावश्यक ईमेल्स सिलेक्ट करून डिलीट करा.
Spam आणि Trash फोल्डरमध्ये भरपूर जागा अडवलेली असते. या दोन्ही फोल्डर्समध्ये जाऊन “Delete all” क्लिक करा.
Gmail, Google Drive आणि Google Photos या तिघांची स्टोरेज मर्यादा एकत्र असते. https://one.google.com/storage या लिंकवर क्लिक करून तुम्ही कुठे किती स्टोरेज वापरलं आहे हे पाहू शकता. Drive मधील मोठ्या फाइल्स डिलीट करा – विशेषतः .zip, .mp4, .iso यांसारख्या.
Gmail मध्ये Promotions आणि Social टॅबमध्ये भरपूर Junk ईमेल्स असतात. category:promotions किंवा category:social सर्च करा. सर्व ईमेल्स सिलेक्ट करून डिलीट करा.
जे मेल्स तुम्ही कधीच उघडत नाही, त्यातून Unsubscribe करा. प्रत्येक मेलच्या तळाशी "Unsubscribe" लिंक असते – त्यावर क्लिक करा. भविष्यातील Junk मेल्स टाळण्यास मदत होईल.