Sameer Amunekar
आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 12 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात पहिला विजय मिळवला आहे.
मुंबईने कोलकातावर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला आहे. मुंबईने दमदार गोलंदाजी करत केकेआरला 16.2 ओव्हरमध्ये 116 धावांवर सर्वबाद केलं.
या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी डेब्यू करणारा अश्वनी कुमारनं भेदक गोलंदाजी केली. त्याच्या धमाकेदार कामगिरीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
अश्वनीने सामन्यात रिंकू सिंह, आंद्रे रसेल, डि काॅक आणि मनीष पांडे यांना बाद केलं. अश्वनीने 3 ओव्हरमध्ये 24 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. आयपीएल पदार्पणात 4 विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय ठरला.
अश्वनीने त्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर विकेट घेतली. अश्वनीने केकेआरचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याला आऊट केलं. अश्वनी यासह मुंबईसाठी पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा चौथा गोलंदाज ठरला.
अश्वनीच्या दमदार कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं.