Manish Jadhav
आयपीएल 2025 मध्ये एमएस धोनीची कामगिरी आतापर्यंत त्याच्या चाहत्यांना जशी आपेक्षित आहे तशी झालेली नाही. काही सामन्यांमध्ये जेव्हा संघाला त्याची आवश्यकता होती, तेव्हा तो खूप खाली खेळाला आला. त्यामुळे त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
मंगळवारी (8 एप्रिल) पंजाबविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही धोनीची इम्पॅक्ट खेळी पाहायला मिळाली नाही, ज्यामुळे चेन्नईचा पुन्हा एकदा पराभव झाला. पण यादरम्यान त्याने विकेटकीपिंगमध्ये एक मोठा रेकॉर्ड केला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या इतिहासात विकेटमागे 150 झेल घेणारा तो पहिला यष्टिरक्षक बनला.
पंजाब किंग्जविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अश्विनच्या गोलंदाजीवर निहाल वढेराला झेलबाद करत धोनीने यष्टीरक्षक म्हणून 150 झेल पूर्ण केले. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला यष्टीरक्षक ठरला. या यादीत दुसरे नाव दिनेश कार्तिकचे आहे, ज्याने आयपीएलमध्ये 137 झेल घेतले.
150 झेल- एमएस धोनी, 137 झेल- दिनेश कार्तिक, 87 झेल- वृद्धिमान साहा, 76 झेल- ऋषभ पंत, 66 झेल- क्विंटन डी कॉक
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात धोनी 5व्या क्रमांकावर खेळायला आला, ज्यादरम्यान त्याने 12 चेंडूत 27 धावा जोडल्या. या खेळीत त्याने एक चौकार आणि 3 षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट 225 होता. मात्र त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.