Manish Jadhav
दूधात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी आणि फॅट असते. नियमित दूध प्यायल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा तर मिळतेच, शिवाय पौष्टीक घटकांमुळे आरोग्याला फायदाच होतो.
पण बऱ्याच वेळेस आपण खाण्यापिण्याशी संबंधित अशा काही चुका करतो, ज्यामुळे हेल्दी पदार्थही आपल्या आरोग्यासाठी घातक ठरतात.
आज (7 एप्रिल) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून दूधासोबत कोणते पदार्थ खाणे टाळावे याबाबत जाणून घेणार आहोत.
आयुर्वेदानुसार दूधात गूळ घालून पिणे आरोग्यासाठी घातक मानले जाते. यामुळे पित्त आणि कफ दोष वाढतो. शिवाय गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.
लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. पण दूध प्यायल्यानंतर लिंबूवर्गीय फळे खाऊ नये. ज्यामुळे पचनाच्या निगडीत समस्या वाढू शकतात.
बरेच जण दूध पिताना स्नॅक्स खातात. पण स्नॅक्समध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.
प्रथिनांनी समृद्ध हिरवे मूग डाळ आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. पण दूधासोबत हिरवे मूग खाऊ नये.