Sameer Amunekar
कोरफड त्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुम होण्यापासून प्रतिबंध करतात. मुरुमानंतरचे काळे डाग कमी करण्यात मदत करते.
अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C, E, आणि बीटा कॅरोटीन असतात, जे त्वचेला टवटवीत आणि तरुण ठेवतात. सुरकुत्या आणि त्वचेवरील झीज कमी करण्यास मदत होते.
कोरफड जेल थंडावा देऊन जळजळ शांत करते. सूर्यामुळे होणारे नुकसान कमी करते आणि त्वचेला पुनरुज्जीवित करते.
नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्मामुळे त्वचेवरील काळपटपणा कमी होतो. नियमित वापरामुळे त्वचेचा नॅचरल ग्लो वाढतो.
लहान खरचटणे, जखमा आणि अॅलर्जी कमी करण्यास मदत करते. संवेदनशील त्वचेसाठी उत्तम पर्याय आहे.
कोरफड ही त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर वनस्पती आहे. कोरफड जेलमध्ये असलेले पोषक घटक त्वचेसाठी उपयुक्त ठरतात.