Sameer Amunekar
क्रिकेटप्रेमींना आयपीएलच्या आगामी पर्वाची उत्सुकता लागली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या वर्षाची आयपीएल स्पर्धा नेमकी कधीपासून चालू होणार? हे विचारले जात होते.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) २३ मार्चपासून सुरू होईल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.
2024 साली आयपीएलचे सामने 22 मार्च रोजी चालू झाले होते. या वर्षी पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगला होता.
2024 सालच्या आयपीएल ट्रॉफीवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आपलं नाव कोरलं होतं. IPL 2025
आयपीएल ही टी-20 क्रिकेट लीग आहे जी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) अंतर्गत 2008 पासून आयोजित केली जात आहे. जगभरातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, भारतीय खेळाडू आणि अनेक युवा प्रतिभावंत यात सहभागी होतात.
आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई दोन्ही संघांनी 5-5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे आता या हंगामात कोणता संघ टीम ट्रॉफी जिंकणार? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.