Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा लिलाव 19 डिसेंबर 2023 रोजी पार पडला. हा लिलाव दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये पार पडला.
या लिलावात एकूण 72 खेळाडूंना बोली लागली. त्यातील 30 परदेशी खेळाडू आहेत.
तसेच 72 खेळाडूंवर मिळून 10 संघांकडून 2,30,45,00,000 रुपये खर्च करण्यात आला.
दरम्यान, हा लिलाव अनेक गोष्टींमुळे ऐतिहासिक ठरला.
यावेळी पहिल्यांदाच परदेशात आयपीएलचा लिलाव झाला. यापूर्वी झालेल्या सर्व 16 हंगामाचे लिलाव भारतात झाले होते.
तसेच आयपीएल 2024 हंगामाच्या लिलावासाठी मलिका सागर यांनी लिलावकर्ता म्हणून काम पाहिले. त्यामुळे त्या लिलावकर्ता म्हणून आयपीएल लिलावात जबाबदारी सांभाळणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या.
यंदाच्या लिलावासाठी चाहत्यांनीही लिलाव होत असलेल्या हॉलमध्ये उपस्थित असण्याची पहिलीच वेळ होती.
याच लिलावात आयपीएल इतिहासात पहिल्यांदा एखाद्या खेळाडूला 20 कोटींहून अधिकची बोली लागली.
या लिलावादरम्यान, मिचेल स्टार्कला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी 24.75 कोटी रुपयांची बोली लावली. तसेच पॅट कमिन्ससाठी सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपये मोजत संघात घेतले. त्यामुळे हे दोघे आयपीएलमधील सर्वात महागडे खेळाडूही ठरले.