Pranali Kodre
इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामसाठी खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर 2024 रोजी दुबईतील कोका-कोला एरिनामध्ये पार पडला.
या लिलावात अनेक स्टार आणि अनुभवी खेळाडूंवर पैशांचा वर्षाव झाला, तर अनेक स्टार खेळाडूंना खरेदीदार मिळालाच नाही.
या लिलावात अनसोल्ड राहिलेल्या अशाच 6 खेळाडूंवर एक नजर टाकू.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथची 2 कोटी मुळ किंमत होती, मात्र त्याला संघात घेण्यासाठी कोणत्यात संघाने पसंती दाखवली नाही.
ऑस्ट्रेलियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेजलवूडलाही कोणी संघात घेतले नाही, तो आयपीएलच्या पहिल्या हाफमध्ये त्याच्या मुलाच्या जन्मामुळे उपलब्ध राहाणार नव्हता, त्याचमुळे त्याला कोणी पसंती दाखवली नसल्याचे म्हटले जात आहे.
इंग्लंडचा स्टार फिरकीपटू आदील राशिदची 2 कोटी मुळ किंमत होती, मात्र त्यालाही कोणी संघात स्थान दिले नाही. विशेष म्हणजे या लिलावानंतर दुसऱ्याच दिवशी तो आयसीसी टी२० क्रमवारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आला.
वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार जेसन होल्डरसाठीही कोणत्याच फ्रँचायझीने बोली लावली नाही. होल्डर एक चांगला गोलंदाजाबरोबरच खालच्या फळीतील चांगला फलंदाजही आहे.
दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज रस्सी वॅन डर ड्यूसेनसाठीही कोणी पसंती दाखवली नाही. त्याची 2 कोटी मुळ किंमत होती.
आयपीएल लिलावाच्या दोन दिवस आधी आणि दुसऱ्या दिवशी अशी वेस्ट इंडिजविरुद्ध टी20 मालिकेत सलग दोन शतके करणारा फिल सॉल्टही या आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिला.