Pranali Kodre
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्ससाठी 2023 हे वर्ष स्वप्नवत ठरले आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार म्हणून त्याने या वर्षात मोठे यश संपादन केले.
कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाने कमिन्सच्या नेतृत्वात जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 चा अंतिम सामना 209 धावांनी जिंकत कसोटीतील विश्वविजेतेपदही जिंकले.
यानंतर कमिन्सच्याच नेतृत्वात जून-जुलै दरम्यान ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धची ऍशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली असली तरी ऍशेसची ट्रॉफी मात्र आपल्याकडेच राखली.
तसेच त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात वनडे वर्ल्डकप स्पर्धा खेळवण्यात आली. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने कमिन्सच्या नेतृत्वात पहिले दोन सामने पराभूत झाल्यानंतर सलग 8 सामने जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला.
वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध 6 विकेट्सने विजय मिळवत सहाव्यांदा वर्ल्डकपवर नाव कोरले. त्यामुळे वनडे वर्ल्डकप जिंकणारा कमिन्स ऑस्ट्रेलियाचा पाचवा कर्णधार ठरला.
19 डिसेंबर 2023 रोजी पार पडलेल्या आयपीएल 2024 लिलावात कमिन्सला सनरायझर्स हैदराबाद संघाने 20.50 कोटी रुपयांची बोली लावली.
त्यामुळे कमिन्स आयपीएलच्या लिलाव इतिहासात 20 कोटींची बोली मिळणारा पहिलाच खेळाडू ठरला, तसेच मिचेल स्टार्कनंतरचा (24.75) दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.