Manish Jadhav
ॲपल प्रेमींसाठी लवकरच एक नवीन आयफोन लाँच होणार आहे. आयफोन एसई 4 बाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरु आहे.
कंपनीने अद्याप या नवीन आयफोनच्या लाँचिंग तारखेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही, परंतु ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हा आगामी आयफोन पुढील आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. या फोनची विक्री या महिन्याच्या अखेरीस सुरु होऊ शकते.
डिझाइनबद्दल बोलायचे झाल्यास मीडिया रिपोर्ट्सनुसार, या फोनची फ्रंट डिझाइन आयफोन 14 सारखी असू शकते.
डिस्प्लेमध्ये तुम्हाला सर्वात मोठी इंप्रूवमेंट दिसून येईल. या फोनमध्ये 60 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह 6.1-इंचाचा OLED पॅनेल दिला जाऊ शकतो. काही अहवालानुसार, या फोनमध्ये नॉच असेल. याशिवाय, डायनॅमिक आयलंड फीचर देखील असेल.
या आगामी फोनमध्ये A18 बायोनिक चिपसेट व्यतिरिक्त 8 जीबी रॅमचा समावेश केला जाऊ शकतो. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 48 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि फ्रंटमध्ये 24 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असू शकतो.
परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या आयफोन मॉडेलमध्ये Apple A18 बायोनिक प्रोसेसर दिला जाऊ शकतो. आयफोन 16 मालिकेतही हाच चिपसेट वापरण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, हा आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली SE फोन असेल.
अहवालानुसार, या फोनची किंमत $499 (सुमारे 43,200 रुपये) पासून सुरु होईल. SE 3 भारतात 43,900 रुपयांना लाँच करण्यात आला होता, परंतु नंतर या फोनची किंमत वाढवण्यात आली होती. ॲपल ब्रँडच्या या आगामी आयफोनची किंमत 50 हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे.