गोमन्तक डिजिटल टीम
मध्य प्रदेश आणि राजस्थानदरम्यानच्या जिल्ह्यांमध्ये आंतरराज्य चित्ता संवर्धन संकुल विकसित करण्यात येणार आहे.
या प्रकल्पात मध्य प्रदेशच्या आठ तर राजस्थानच्या सात जिल्ह्यांचा समावेश असेल
मंदसौर येथील गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात चित्त्यांची नवी पलटण आणली जाईल.
पाच वर्षे त्यांची काळजी घेऊन त्यांना पुढच्या पाच वर्षांत खुल्या जंगलात सोडले जाईल.
अभयारण्याच्या ६४ चौरस किमी क्षेत्रफळात अन्य श्वापदांचे हल्ले होणार नाही तसेच चित्त्यांची संख्या वाढेल, याची काळजी घेऊन ५ ते ८ चित्ते सोडण्यात येतील.
चित्त्यांच्या नव्या चमूसाठी गांधीसागर अभयारण्याचे ३६८ चौरस किमीचे जंगल सज्ज करण्यात येत आहे
दक्षिण आफ्रिकेतून १२ चित्ते आणले होते. त्यापैकी ५ नर, ३ मादी मरण पावले. दरम्यान १७ पिलांचा जन्म झाला आणि त्यापैकी १२ जिवंत आहेत. एकूण चित्त्यांची संख्या २४ झाली आहे.