गोमन्तक डिजिटल टीम
ज्याप्रमाणे मानवाला स्वतंत्रपणे जगायचा अधिकार आहे, तसाच तो अधिकार या निसर्गात जगत असलेल्या प्रत्येक वन्यजीवालाही आहे.
१९७२ अंतर्गत कायद्याच्या माध्यमातून वन्यजीवांना संरक्षण देण्यात आले आहे.
निसर्गात वन्यजीवांनादेखील मानवाइतकाच जगण्याचा अधिकार निसर्गाने दिला आहे हे हा कायदा अधोरेखित करतो.
ज्यावेळी आपण जंगलातून जातो, तेंव्हा आपण त्यांच्या घरात आहोत याची जाणीव प्रत्येकाला हवी.
आपण इको टुरिझमच्या नावाखाली वन्यजिवांसमोर हजारो अडचणी तयार करत आहोत, ,त्यांच्या घरात घुसत आहोत यावर विचार केला पाहिजे.
आपल्याला जर वन्यजीवांना संरक्षित करायचे असेल तर त्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवला पाहिजे.
राष्ट्रीय उद्याने, राखीव वनक्षेत्र यांचे संगोपन करणे गरजेचे आहे.
मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष वाढला आहे, यावरती गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे.