Cashew Production: गोव्यात शेतकरी चिंताग्रस्त! हवामान बदलामुळे सतावतेय 'ही' भीती

गोमन्तक डिजिटल टीम

काजू

राज्यात काजू हे एक महत्त्वाचे पीक आहे. काजू पिकावर अनेक कुटुंबीयांचा संसार अवलंबून आहे.

Goa's cashew production

हवामान बदल

सातत्‍याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या हवामान बदलांचा परिणाम काजू उत्पादकांसमोर मोठे संकट बनून ठाकला आहे.

Goa's cashew production

मोहोर

राज्यात आता काजूला मोहोर यायला सुरूवात झाली आहे.

Goa's cashew production

पिकात घट

सुरू असलेला अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढत असलेले तापमान यामुळे यंदाही काजू उत्पादक शेतकऱ्यांना पिकात घट होण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Goa's cashew production

तापमान घातक

या काळात जर पाऊस पडला तर तो पिकांसाठी चांगलाच असतो. परंतु ढगाळ वातावरण, मोठ्या प्रमाणात वाढलेले तापमान घातक असते.

Goa's cashew production

५७००१ हेक्टर क्षेत्रफळ

राज्यात ५७००१ हेक्टर क्षेत्रफळात काजू लागवड करण्यात आली आहे. मागील आर्थिक वर्षात राज्यात २४२४० टन इतके काजू उत्पादन घेण्यात आले.

Goa's cashew production

गेल्या वर्षीही घट

गेल्या वर्षी सततच्या हवामान बदलांमुळे पिकात घट झाली होती. काजूला योग्य भाव देखील मिळाला नाही. गेल्या वर्षी फेणी, हुर्राक काढणाऱ्यांना बोंडू मिळणे कठीण झाले होते.

Goa's cashew production
Winter Trekking Goa