Akshata Chhatre
यंदाच्या ख्रिसमसला आपल्या लहान मुलांना काय गिफ्ट द्यावं म्हणून विचार करताय?
आज आम्ही तुम्हाला यामध्येच मदत करणार आहोत.
लहान मुलांना गिफ्ट्स भरपूर आवडतात, त्यामुळे त्यांना असं काहीतरी द्या ज्यामुळे त्यांना सणाचा आनंद मिळेल.
मूल अगदीच लहान असेल तर एखादं सॉफ्ट टॉय देऊ शकता.
तुमच्या मुलाला जर का गाड्या आवडत असतील तर लाईटवर चालणाऱ्या गाड्या विकत घेऊ शकता.
लहान मुलगी असेल तर तिला छोटीशी पण गोड बाहुली द्या.
मुलांना खेळाची आवड असेल तर क्रिकेटचा मिनी किट, शब्द बनवण्याची गेम अशा वस्तू दिल्या जाऊ शकतात.