Sameer Panditrao
इस्राईलविरोधातील संघर्षात इराणने प्रथमच क्लस्टर बाँबचा वापर केला आहे.
क्लस्टर बाँबचा हवेत स्फोट झाल्यानंतर त्यातून आणखी शेकडो स्फोटके बाहेर पडतात. ती मोठ्या भूप्रदेशात विध्वंस घडवून आणतात.
एकाच वेळी फुटणाऱ्या बाँबपेक्षा हे शस्त्र अधिक घातक मानले जाते.
विशेष म्हणजे ही स्फोटके स्वयंचलित नसतात.
जमिनीवर पडल्यानंतर त्यांचा अल्पावधीत स्फोट होतो.
यानंतरही काही स्फोटके तशीच न फुटलेल्या अवस्थेत पडून राहतात त्यामुळे त्यांचा नंतर स्फोट होऊन त्यात नागरिक जखमी होण्याचा धोका असतो.
लोकसंख्येची अधिक घनता असलेला भूप्रदेश, घरे आणि पायाभूत सुविधांचा या बाँबमुळे विध्वंस होतो.