Fitness Tips: फिट राहायचंय, वजनही कमी करायचंय; पण व्यायामाची सुरुवात कशी करावी? नवशिक्यांसाठी या Pro टिप्स ठरतील फायदेशीर

Sameer Amunekar

सुरुवात हळूहळू करा

व्यायामाची सवय नसेल, तर सुरुवातीला दररोज १० ते १५ मिनिटे हलका व्यायाम करा. शरीराला सवय झाल्यानंतर वेळ आणि तीव्रता हळूहळू वाढवा.

Fitness Tips for Beginners | Dainik Gomantak

चालण्यापासून करा सुरुवात

वजन कमी करण्यासाठी चालणे हा सोपा पर्याय आहे. सुरुवातीला १५ ते २० मिनिटे चाला आणि क्षमतेनुसार चालण्याचा वेळ वाढवा.

Fitness Tips for Beginners | Dainik Gomantak

वॉर्मअप करायला विसरू नका

व्यायामापूर्वी ५ ते १० मिनिटे हलके वॉर्मअप करा. यामुळे शरीर व्यायामासाठी तयार होण्यास मदत होते.

Fitness Tips for Beginners | Dainik Gomantak

स्ट्रेंथ ट्रेनिंग

स्क्वॅट्स, वॉल पुश-अप्स आणि हलके डंबेल्स यांसारखे व्यायाम करा. स्नायू मजबूत ठेवण्यासाठी आठवड्यातून किमान दोन दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंगचा समावेश करा.

Fitness Tips for Beginners | Dainik Gomantak

आहाराकडे विशेष लक्ष द्या

आहारात भाज्या, फळे, प्रथिनयुक्त पदार्थ आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. वजन कमी करण्यासाठी संतुलित आहार आणि योग्य प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.

Fitness Tips for Beginners | Dainik Gomantak

पुरेशी झोप आणि पाणी घ्या

दररोज पुरेसे पाणी प्या आणि नियमित झोप घ्या. प्रौढांनी साधारणपणे ७ ते ९ तास झोप घेण्याचा प्रयत्न करावा.

Fitness Tips for Beginners | Dainik Gomantak

सातत्य ठेवा, घाई करू नका

वजन कमी करण्यासाठी लगेच मोठे बदल करण्याची गरज नाही. नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि संयम यांच्या मदतीने हळूहळू प्रगती साधा.

Fitness Tips for Beginners | Dainik Gomantak

नवरात्रीत दिसायचंय सर्वात सुंदर आणि आकर्षक? फॉलो करा 'या' खास ब्युटी टिप्स

येथे क्लिक करा