Sameer Panditrao
नुकताच जागतिक बँकेचा अहवाल प्रसिद्ध झाला.
दारिद्र्य निर्मूलनाच्या प्रयत्नांमध्ये भारताने मोठी झेप घेतली आहे.
११ वर्षांच्या काळामध्ये देशाच्या लोकसंख्येमध्ये अत्यंत गरीब नागरिकांची संख्या २७ टक्क्यांवरून ५.३ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यामध्ये यश आले आहे.
२०११-१२ ते २०२२-२३ या ११ वर्षांच्या काळामधील ही आकडेवारी आहे.
जागतिक बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
या काळामध्ये २६.९ कोटी नागरिक अत्यंत गरिबीतून बाहेर आले आहेत.
देशासाठी ही समाधानकारक बाब आहे.