Manish Jadhav
रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. यातच आता, भारतात लवकरच एअर ट्रेन धावणार आहे. त्यासाठी जवळपास 2000 कोटी रुपयांचा खर्च येण्याचा अंदाज आहे.
देशात रेल्वेचे मजबूत जाळे विणलेले आहे. दररोज जवळपास दोन ते अडीच कोटी प्रवासी ट्रेनने प्रवास करतात.
पण प्रवाशांसाठी आता हवाई ट्रेन धावणार आहे. ही रेल्वे अत्यंत खास आणि आकर्षक असेल.
देशातील ही पहिली आणि एकमेव ट्रेन आहे. ही ट्रेन स्वयंचलित असेल.
दिल्ली विमानतळावर कनेक्टिव्हिटी अजून प्रभावी करण्यासाठी ही ट्रेन सुरु करण्यात येणार आहे.
हा प्रोजेक्ट येत्या तीन वर्षांत, 2027 च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे. यासाठी अंदाजित खर्च 2000 कोटी रुपये इतका आहे.