पॅरिस ऑलिम्पिकपूर्वीच 31 वर्षीय स्टार भारतीय बॅडमिंटनपटूची निवृत्ती

Pranali Kodre

बी साई प्रणितची निवृत्ती

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू बी साई प्रणितने 4 मार्च 2024 रोजी निवृत्ती जाहीर केली आहे.

B Sai Praneeth | Instagram

31 व्या वर्षीच निवृत्ती

पॅरिस ऑलिम्पिक 2024 पूर्वी वयाच्या 31 व्या वर्षीच त्याने निवृत्ती जाहीर केल्याने बॅडमिंटन चाहत्यांना धक्का बसला आहे.

B Sai Praneeth | Instagram

सोशल मीडियावर केली घोषणा

बी साई प्रणितने सोशल मीडियावर पोस्ट करत बॅडमिंटनमधून निवृत्त होत असल्याचे त्याने सांगितले. यावेळी त्याने त्याच्या प्रशिक्षकांचे, कुटुंबियांचे, मित्रपरिवाराचे आणि बॅडमिंटन असोसिएशनचे आभार मानले आहेत.

B Sai Praneeth | Instagram

वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदक

बी साई प्रणितने 2019 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. त्यावेळी तो 36 वर्षांनी या स्पर्धेत पदक जिंकणारा भारतीय खेळाडू होता. प्रकाश पदुकोण यांनी 1983 मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

B Sai Praneeth | Instagram

टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग

सिंगापूर ओपन, कॅनडा ओपन, थायलंड ओपन या स्पर्धा जिंकण्याबरोबरच टोकियो ऑलिम्पिकमध्येही सहभाग नोंदवला होता.

B Sai Praneeth | Instagram

सर्वोत्तम क्रमवारी

नोव्हेंबर 2019 मध्ये त्याने त्याच्या कारकिर्दीत जागतिक क्रमवारीत 10 वा क्रमांक मिळवला होता. ही त्याची सर्वोत्तम क्रमवारी होती.

B Sai Praneeth | Instagram

पुरस्कार

बी साई प्रणितला 2019 मध्ये अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले होते.

B Sai Praneeth | Instagram

IPL 2024: डेल स्टेनच्या जागेवर सनरायझर्स हैदराबादमध्ये सामील झाला 'हा' दिग्गज

Dale Steyn | X/SunRisers