Indian Railway: इतकी खास असणार नवीन 'इंडियन रेल्वे'; वेगाने होतोय विस्तार

Manish Jadhav

भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वेने अलीकडेच पायाभूत सुविधा आणि कामकाजात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत.

Indian Railway | Dainik Gomantak

नेटवर्क

ताशी 130 किलोमीटर वेगाने गाड्या चालवण्यास सक्षम ट्रॅक लांबीमध्ये वाढ करुन रेल्वे नेटवर्क आता आणखी वेगवान आणि कार्यक्षम बनले आहे.

Indian Railway | Dainik Gomantak

वेग

अधिकाऱ्यांच्या मते, भारतीय रेल्वेच्या 1.03 लाख ट्रॅक किलोमीटर (TKM) नेटवर्कपैकी 23,000 TKM ट्रॅक ताशी 130 किलोमीटरचा वेग सहन करण्यास सक्षम आहेत. याव्यतिरिक्त, 54,337 TKM ट्रॅक आता 110 किमी प्रतितास वेगाने ट्रेन धावण्यासाठी तयार आहेत.

Indian Railway | Dainik Gomantak

चालू आर्थिक वर्ष

चालू आर्थिक वर्षात 5,000 TKM नेटवर्क सुधारित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते, त्यापैकी 2,741 TKM आधीच 110 किमी प्रतितास वेगाने अपग्रेड केले गेले आहे.

Indian Railway | Dainik Gomantak

वंदे भारत एक्सप्रेस

वंदे भारत एक्सप्रेस ताशी 160 किलोमीटर वेगाने धावण्यास सक्षम आहे. याशिवाय, वंदे भारत स्लीपरही तयार आहे. तिचा पहिला प्रोटोटाइप डिसेंबर 2024 मध्ये RDSO फील्ड ट्रायलसाठी निघेल. राजधानी एक्स्प्रेसच्या तुलनेत ही ट्रेन अधिक गती, सुरक्षितता आणि प्रवासी सुविधा देईल.

Indian Railway | Dainik Gomantak

महसूल

चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत रेल्वेने आपल्या महसुलात 4 टक्क्याची वाढ नोंदवली असून ती 1.93 लाख कोटी रुपये झाली आहे. मालवाहतुकीतून महसूल 1.26 लाख कोटी रुपये तर प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न 6 टक्क्यांनी वाढून 55,988 कोटी रुपये झाले.

Indian Railway | Dainik Gomantak

सुविधा

वेग, सुरक्षितता आणि प्रवाशांचा अनुभव सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे ट्रॅक आणि सिग्नलिंग पायाभूत सुविधांवर भर देत आहे.

Indian Railway | Dainik Gomantak
आणखी बघा