Sameer Panditrao
भारतीय बनावटीची पाणबुडीरोधक अँड्रोथ ही उथळ पाण्यातील युद्धनौका भारतीय नौदलात दाखल झाली आहे.
हिंद महासागरात चीनच्या वाढत्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर या युद्धनौकेमुळे नौदलाच्या सामर्थ्यात आणखी वाढ होणार आहे.
ही युद्धनौका नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली.
अशा प्रकारच्या एकूण आठ युद्ध नौका नौदलात दाखल होणार असून त्या मालिकेतील ही दुसरी युद्धनौका आहे.
नौदलाची पाणबुडीरोधक क्षमता वाढविण्यासाठी आणि समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी अशा प्रकारच्या युद्धनौका उपयुक्त ठरणार आहेत.
लक्षद्वीप द्वीपसमूहातील ‘अँड्रॉट’ या मोठ्या बेटाचे नाव या युद्धनौकेला दिले आहे.
या युद्धनौकेची लांबी सुमारे ७७ मीटर आहे (डिझेल इंजिन आणि वॉटरजेट प्रणाली असलेली नौदलातील सर्वांत मोठी युद्धनौका)