शुभमंगल सावधान! नवदीप सैनी अडकला लग्नबंधनात

Pranali Kodre

नवदीपचे लग्न

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनी बोहल्यावर चढला आहे.

Navdeep Saini marries Swati Asthana | Instagram

गर्लफ्रेंडबरोबर अडकला लग्नबंधनात

नवदीपने 23 नोव्हेंबर 2023 रोजी त्याची गर्लफ्रेंड स्वाती अस्थानाबरोबर लग्न केले आहे.

Navdeep Saini marries Swati Asthana | Instagram

फोटो

नवदीपने त्याच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत.

Navdeep Saini marries Swati Asthana | Instagram

नवदीप-स्वातीचे फोटो व्हायरल

या फोटोमध्ये नवदीप आणि स्वाती लग्नाचे विविध विधी करतानाही दिसत आहेत.

Navdeep Saini marries Swati Asthana | Instagram

पोषाख

नवदीप आणि स्वाती यांनी पांढरा, गुलाबी आणि लाल रंगछटा असलेला लग्नाचा पोषाख परिधान केलेला दिसत आहे.

Navdeep Saini marries Swati Asthana | Instagram

स्वातीची आवड

स्वाती ही व्लॉगर असून ती फॅशन, प्रवास आणि लाईफस्टाईल अशा विषयांवर अनेकदा सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे युट्यूब चॅनेल देखील आहे.

Navdeep Saini marries Swati Asthana | Instagram

दिल्लीचे प्रतिनिधित्व

नवदीप नुकताच दिल्लीकडून सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी 2023 स्पर्धा खेळताना दिसला होता.

Navdeep Saini marries Swati Asthana | Instagram

भारताचे प्रतिनिधित्व

नवदीपने आत्तापर्यंत भारताचे 2 कसोटी, 8 वनडे आणि 11 टी20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. त्याने या एकूण 21 सामन्यांमध्ये 23 विकेट्स घेतल्या आहेत.

Navdeep Saini marries Swati Asthana | Instagram

सूर्यकुमारच्या कॅप्टन्सीची विजयी सुरुवात

Suryakumar Yadav | BCCI
आणखी बघण्यासाठी