Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 23 नोव्हेंबर रोजी टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. विशाखापट्टणमला झालेल्या या सामन्यात भारताने अखेरच्या षटकात 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.
मात्र, या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग डायमंड डकचा शिकार झाला.
ज्यावेळी खेळाडू एकही चेंडू न खेळता शुन्यावर बाद होतो, त्याला डायमंड डक होणे, म्हटले जाते.
सलामीला फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालच्या दुसऱ्या धावेसाठी धावताना गोंधळ झाल्याने ऋतुराज एकही चेंडू न खेळता धावबाद झाला.
तसेच अखेरच्या षटकात 9 व्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला अर्शदिप सिंगही एकही चेंडू न खेळता धावबाद झाला.
दरम्यान ऋतुराज हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डायमंड डक होणारा भारताचा तिसरा. तर अर्शदीप चौथा खेळाडू आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराह आणि अमित मिश्रा हे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये डायमंड डकचा शिकार झाले आहेत.
साल 2016 मध्ये पुण्यात श्रीलंकेविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात बुमराह डायमंड डकवर बाद झालेला.
तसेच अमित मिश्रा 2017 साली नागपूरला इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी20 सामन्यात डायमंड डकवर बाद झालेला.