Pranali Kodre
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफचा जन्म 1 डिसेंबर 1980 रोजी उत्तर प्रदेशमधील अलाहबादमध्ये झाला.
त्याने 2000 ते 2006 दरम्यान भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले.
दरम्यान, भारताकडून खेळत असताना कैफने एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून नावलौकिक मिळवला. तो आजही भारताच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
कैफ 19 वर्षांखालील भारतीय संघाकडूनही खेळला. विशेष म्हणजे 2000 साली 19 वर्षांखालील विश्वचषक भारताने कैफच्या नेतृत्वाखाली जिंकला होता.
त्याने 2002 साली भारताला नॅटवेस्ट सिरीज जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. त्याची अंतिम सामन्यातील 87 धावांची खेळी भारताच्या क्रिकेट इतिहासातील अविस्मरणीय खेळींपैकी एक ठरली.
कैफने त्याच्या कारकिर्दीत 13 कसोटी आणि 125 वनडे सामने खेळले.
त्याने कसोटीत एक शतक आणि तीन अर्धशतकांसह 624 धावा केल्या. तसेच वनडेत 32.01 च्या सरासरीने 2 शतके आणि 17 अर्धशतकांसह 2753 धावा केल्या.
कैफ खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर समालोचन आणि प्रशिक्षण क्षेत्रात सक्रिय आहे.