Pranali Kodre
वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. हा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात होईल.
या अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.
त्यामुळे वनडे वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करणारा तो चौथा कर्णधार ठरला आहे.
यापूर्वी भारताने 1983, 2003 आणि 2011 अशा तीन वर्षी वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला होता, या तिन्ही वेळी भारताचे नेतृत्व तीन वेगवेगळ्या कर्णधारांनी केलं होतं.
1983 साली भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली अंतिम सामना खेळला होता, ज्यात भारताने विजय मिळवत पहिल्यांदा विश्वविजय मिळवला होता.
2003 साली सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, पण ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला.
2011 साली भारताने श्रीलंकेविरुद्ध वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळला होता, त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद जिंकले होते.