गोमन्तक डिजिटल टीम
गवा जो इंडियन बायसन म्हणून ओळखला जातो, हा भारतातील सर्वात मोठा बैलकुळातील प्राणी आहे.
गव्याची ताकद, पिळदार शरीर आणि वजनामुळे तो इतर वन्य प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो.
गव्याला गोव्याच्या राज्य प्राण्याचा दर्जा देण्यात आला आहे. गोव्यातील जंगलांमध्ये हे प्राणी मोठ्या प्रमाणावर आढळतात.
गव्याचे शरीर मजबूत, काळसर तपकिरी असते आणि डोक्यावर शिंगे असतात. त्याची उंची साधारणतः 5 ते 6 फूट असते, तर वजन 700 ते 1000 किलो पर्यंत जाऊ शकते.
गवा हा पूर्णतः शाकाहारी प्राणी आहे. तो मुख्यतः गवत, पानांचा आहार घेतो.
गवा भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत संरक्षित प्राणी आहे.
गोव्याचा हद्दीवरील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातही गवे भरपूर आढळून येतात.