Pranali Kodre
भारताचा 34 वर्षीय क्रिकेटपटू सौरभ तिवारीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 16 फेब्रुवारीपासून सुरू होणारा झारखंड विरुद्ध राजस्थान हा रणजी सामना त्याचा अखेरचा सामना असेल, असे त्याने स्पष्ट केले.
तिवारीने 17 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये भारत, बिहार, झारखंड आणि दिल्ली डेअरडेविल्स, मुंबई इंडियन्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या तार आयपीएल संघांचेही प्रतिनिधित्व केले.
तिवारी 2008 साली विराट कोहलीच्या नेतृत्वात 19 वर्षांखालील वर्ल्डकप जिंकलेल्या भारतीय संघाचाही भाग होता.
तिवारीने 2010 साली भारतीय संघाकडून 3 वनडे सामनेही खेळले, ज्यात त्याने 49 धावा केल्या.
त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 115 सामने खेळताना 22 शतके आणि 34 अर्धशतकांसह 47 च्या सरासरीने 8030 धावा केल्या.
तिवारीने 116 लिस्ट ए क्रिकेट सामने खेळताना 46 च्या सरासरीने 6 शतकांसह 4050 धावा केल्या आहेत.
तिवारीने 181 टी20 सामने खेळले, त्यात त्याने 3454 धावा केल्या. या 181 सामन्यांमध्ये आयपीएलच्या 93 सामन्यांचा समावेश आहे. त्याने 93 आयपीएल सामन्यांत 8 अर्धशतकांसह 1494 धावा केल्या आहेत.
तिवारीने सर्व क्रिकेट प्रकारात मिळून झारखंडचे 88 सामन्यांत नेतृत्वही केले. यामध्ये त्याने 36 सामने जिंकले, तर 33 सामने पराभूत झाले. तसेच 19 सामने अनिर्णित राहिले.