Sameer Panditrao
२९ मार्च ही तारीख भारतीय क्रिकेटसाठी खास आहे. का ते जाणून घेऊ.
२९ मार्च या तारखेला भारताच्या एका विस्फोटक फलंदाजाने दोनदा विक्रमी खेळी केली होती.
२००४ पूर्वी भारतीय फलंदाजाने कसोटीमध्ये त्रिशतक केलेले न्हवते.
भारताचा माजी फलन्दाज वीरेंद्र सेहवाग याने एकाच तारखेला दोन त्रिशतके झळकावली होती.
२९ मार्च २००४ रोजी सेहवागने मुलतान येथे पाकिस्तानविरुद्ध ३०९ धावांची खेळी करून तो पहिला भारतीय त्रिशतकवीर बनला.
त्यांनतर २००८ मध्ये २९ मार्च रोजीच त्याने साऊथ आफ्रिकेविरुद्ध ३१९ धावांची खेळी केली होती
सेहवागनंतर करूण नायर या भारतीय फलंदाजाने त्रिशतक झळकावलेले आहे .