Sameer Amunekar
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) शुक्रवारी (28 मार्च) बेंगळुरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स इथं फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी अर्ज मागवले आहेत.
बीसीसीआयनं ट्विट करत ही माहिती दिली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी कोण अर्ज करु शकते याची माहितीही बीसीसीआयनं दिलीय.
गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे.
गोलंदाजी प्रशिक्षक पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला बीसीसीआयनं एक फॅार्म दिला आहे, तो भरावा लागेल.
फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकासाठी कोणती पात्रता आणि अनुभव आवश्यक आहे, याची माहिती बीसीसीआयनं परिपत्रकात दिलीय.
बीसीसीआयनं परिपत्रकात या पदाबाबत सविस्तर माहिती दिलीय.