Sameer Panditrao
देशभरात अंदाजे ८,००० सरकारी शाळांमध्ये सन २०२४-२५ या शैक्षणिक सत्रादरम्यान एकही विद्यार्थी दाखल झाला नाही.
यापैकी सर्वांत जास्त शाळा पश्चिम बंगालमध्ये असून, त्यानंतर तेलंगणाचा क्रमांक लागतो
शून्य विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळांमध्ये एकूण २०,८१७ शिक्षक कार्यरत आहेत.
गेल्या वर्षी १२,९५४ शाळांमध्ये शून्य विद्यार्थीसंख्या होती. आता या आकडेवारीमध्ये काहीसा बदल दिसतो.
दुसरीकडे, हरियाना, महाराष्ट्र, गोवा, आसाम, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये अशी एकही शाळा नाही.
पुद्दुचेरी, लक्षद्वीप, दादरा आणि नगर हवेली, अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह, दमण आणि दीव आणि चंडीगड येथेही शून्य विद्यार्थी संख्येच्या शाळा नाहीत.
यापैकी काही शाळांमध्ये गेल्या तीन शैक्षणिक वर्षांपासून एकही विद्यार्थी दाखल झालेला नाही.
गोव्यात 'या' फळाला जोरदार बहर