Pranali Kodre
भारतीय महिला संघ आणि इंग्लंड महिला संघ यांच्यात चार दिवसीय कसोटी सामन्याला 14 डिसेंबर 2023 रोजी सुरुवात झाली.
या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पहिल्या दिवसाखेर भारताने 94 षटकात 7 बाद 410 धावा केल्या.
त्यामुळे महिलांच्या कसोटीमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आला असून त्यांनी 27 वर्षे जुना विक्रम मोडला आहे.
27 वर्षांपूर्वी 1996 साली न्यूझीलंड महिला संघाने गिल्डफोर्डला इंग्लंड महिला संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्याच दिवशी 5 बाद 362 धावा केल्या होत्या. ही धावसंख्या आता या विक्रमाच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर घसरली आहे.
या विक्रमाच्या यादीत पहिल्या क्रमांकावर इंग्लंड महिला संघ असून त्यांनी 1935 साली न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध ख्राईस्टचर्च येथे झालेल्या कसोटीत पहिल्याच दिवशी 4 बाद 431 धावा केल्या होत्या.
त्यामुळे महिला कसोटीमध्ये पहिल्याच दिवशी 400 हून अधिक धावा करणारा भारतील संघ केवळ दुसराच संघ ठरला आहे.
महिलांच्या कसोटीमध्ये पहिल्याच दिवशी सर्वाधिक धावा करणाऱ्या संघांच्या यादीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर इंग्लंड महिला संघच आहे.
साल 1960 मध्ये जोहान्सबर्गला दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध झालेल्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या दिवशी 6 बाद 351 धावा केल्या होत्या. तसेच 1986 साली वॉर्सेस्टरशायरला भारतीय महिला संघाविरुद्ध कसोटी सामना खेळताना इंग्लंडने पहिल्याच दिवशी 7 बाद 332 धावा केल्या होत्या.