Google वर 2023 मध्ये ट्रेंडिग असलेल्या 10 खेळाडूंमध्ये 'हा' एकमेव भारतीय

Pranali Kodre

2023 मध्ये सर्वाधिक ट्रेंड झालेले 10 खेळाडू

साल 2023 आता संपत असून अखेरचे काही दिवस उरले आहेत. अशात गुगलने या वर्षभरात सर्वाधिक ट्रेंड झालेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत असलेल्या पहिल्या 10 खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.

Sports Day | Dainik Gomantak

1. डॅमर हॅम्लिन

अमेरिकन फुटबॉलमधील लोकप्रिय खेळाडू डॅमर हॅम्लिन या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

Damar Hamlin | X

2. किलियन एमबाप्पे

फ्रान्सचा स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Kylian Mbappe | Twitter

3. ट्रेविस केल्सी

अमेरिकन फुटबॉलमधीलच खेळाडू ट्रेविस केल्सी 2023 मध्ये ट्रेंड झालेला तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

Travis Kelce | X

4. जा मोरंट

स्टार बास्केटबॉलपटू जा मोरंट चौथ्या क्रमांकाच ट्रेंड होणारा खेळाडू आहे.

Ja Morant | X

5. हॅरी केन

इंग्लंडचा अनुभवी फुटबॉलपटू हॅरी केन या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे.

Harry Kane | X

6. नोवाक जोकोविच

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा टेनिसपटू नोवाक जोकोविच 2023 मध्ये ट्रेंड होणारा सहाव्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

Novak Djokovic | Twitter

7. कार्लोस अल्कारेज

स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कारेज या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.

Carlos Alcaraz | Twitter

8. रचिन रविंद्र

वर्ल्डकप 2023 स्पर्धा गाजवणारा न्यूझीलंडचा युवा क्रिकेटपटू रचिन रविंद्र 2023 मध्ये ट्रेंड होणारा आठव्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

Rachin Ravindra

9. शुभमन गिल

भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल 2023 मध्ये ट्रेंड झालेला नवव्या क्रमांकाचा खेळाडू आहे.

Shubman Gill | X/BCCI

10. कायरी इर्विंग

2023 मध्ये ट्रेंडमध्ये असलेल्या 10 खेळाडूंमध्ये दहाव्या क्रमांकावर बास्केटबॉलपटू कायरी इर्विंग आहे.

Kyrie Irving | X

T20I मध्ये सर्वात कमी बॉल्समध्ये 2000 धावा करणारे पाच क्रिकेटर

Suryakumar Yadav