India vs England: कधी आणि कुठे होणार कसोटी सामने? पाहा वेळापत्रक

Pranali Kodre

इंग्लंडचा भारत दौरा

इंग्लंड क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर इंग्लंड संघ भारताविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.

Ben Stokes | PTI

भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार असून 11 मार्चपर्यंत ही मालिका चालणार आहे.

Team India | PTI

वेळ

भारत विरुद्ध इंग्लंड संघातील पाचही कसोटी सामन्यांतील प्रत्येक दिवसाचा खेळ हा भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 9.30 वाजता सुरू होणार आहे.

Team India | PTI

पहिला सामना

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पहिला कसोटी सामना 25 ते 29 जानेवारी 2024 दरम्यान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबादला खेळला जाणार आहे.

Joe Root | PTI

दुसरा सामना

भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना 2 ते 6 फेब्रुवारी 2024 दरम्यान डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम येथे होणार आहे.

Ben Stokes | PTI

तिसरा सामना

भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना 15 ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे होईल.

Rohit Sharma | X/BCCI

चौथा सामना

भारत विरुद्ध इंग्लंड संघात चौथा कसोटी सामना 23 ते 27 फेब्रुवारी 2024 दरम्यान झारखंड क्रिकेट असोसिएशन आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची येथे होईल.

Ravindra Jadeja - R Ashwin | PTI

पाचवा सामना

भारत विरुद्ध इंग्लंड संघात पाचवा कसोटी सामना 7 ते 11 मार्च 2024 दरम्यान हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला येथे होणार आहे.

Shubman Gill | PTI

कुठे पाहाणार सामने?

टीव्हीवर हे सामने स्पोर्ट्स 18 नेटवर्क चॅनेलवर, तर जिओ सिनेमा ऍप आणि वेबसाईटवरही लाईव्ह प्रक्षेपण पाहाता येणार आहे.

Rohit Sharma | PTI

India vs England येणार आमने-सामने; पाहा 'हेड-टू-हेड' रेकॉर्ड

India vs England | X/ICC