India vs England येणार आमने-सामने; पाहा 'हेड-टू-हेड' रेकॉर्ड

Pranali Kodre

इंग्लंडचा भारत दौरा 2024

इंग्लंडचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात इंग्लंडला भारताविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे.

Joe Root and Ben Stokes | X/CountyChamp

भारत विरुद्ध इंग्लंड

भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेला 25 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

Rohit Sharma - Jasprit Bumrah | X/BCCI

आत्तापर्यंतचे कसोटी सामने

दरम्यान भारत आणि इंग्लंड संघात आत्तापर्यंत 131 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत.

Virat Kohli - Joe Root | X/ICC

निकाल

या 131 कसोटीतील 31 सामने भारताने जिंकले आहेत. तसेच 50 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. त्याचबरोबर 50 सामने अनिर्णित राहिले आहेत.

England Test Team | X/ICC

भारतातील कसोटी सामने

भारतामध्ये इंग्लंड आणि भारत या दोन संघात 64 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. यातील 22 सामने भारताने जिंकले आहेत, तर 14 सामने इंग्लंडने जिंकले आहेत. तसेच 28 सामने अनिर्णित राहिले आहेत.

भारतातील अखेरची मालिका

भारत आणि इंग्लंड यांच्यात भारतात 2021 मध्ये अखेरची कसोटी मालिका झाली होती, ज्यात भारताने 3-1 ने विजय मिळवला होता.

Team India | PTI

अखेरची मालिका

तसेच 2021-22 मध्ये भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यात खेळलेल्या कसोटी मालिकेत 2-2 अशी बरोबरी झाली होती.

England Test Team | X/ICC

12 वर्षांपूर्वी...

भारतीय संघ गेल्या 12 वर्षात एकदाही कसोटी मालिकेत पराभूत झालेला नाही. यापूर्वी 2012 साली इंग्लंडनेच शेवटचे भारताला कसोटी मालिकेत पराभूत केले होते.

Team India | PTI

ICC कडून 2023 वर्षातील सर्वोत्तम कसोटी, वनडे अन् टी-20 संघ जाहीर

WTC Final | Twitter