ICC कडून 2023 वर्षातील सर्वोत्तम कसोटी, वनडे अन् टी-20 संघ जाहीर

Pranali Kodre

आयसीसी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) दरवर्षी वर्षभरात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मिळून प्रत्येक क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम संघ जाहीर केला जातो.

Cricket | X/ICC

सर्वोत्तम संघ

त्यानुसार आयसीसीने 2023 वर्षातील सर्वोत्तम टी20, वनडे आणि कसोटी संघ जाहीर केले आहेत.

India vs Australia | X

चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान

आयसीसीने प्रत्येक प्रकारातील सर्वोत्तम संघात त्यात्या प्रकारात 2023 वर्षात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले आहे.

Team India | X/BCCI

प्रत्येक जागेसाठी कामगिरीचा विचार

दरम्यान, संघातील प्रत्येक जागेसाठी त्या जागेवर चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा विचार करण्यात आला आहे.

India vs Australia | X

आयसीसीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टी20 संघ (पुरुष) -

यशस्वी जयस्वाल, फिल सॉल्ट, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क एडेर, रवी बिश्नोई, रिचर्ड एनगवरा आणि अर्शदीप सिंग.

Suryakumar Yadav | Instagram

आयसीसीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय वनडे संघ (पुरुष) -

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डॅरिल मिचेल, हेन्रिच क्लासेन (यष्टीरक्षक), मार्को यान्सिन, ऍडम झम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.

Mohammad Shami - Rohit Sharma | ICC

आयसीसीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय कसोटी संघ (पुरुष) -

उस्मान ख्वाजा, दिमुथ करुणारत्ने, केन विलियम्सन, जो रुट, ट्रेविस हेड, रविंद्र जडेजा, ऍलेक्स कॅरे (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), रविचंद्रन अश्विन, मिचेल स्टार्क, स्टुअर्ट ब्रॉड.

Australia WTC 2023 Final | X/ICC

विराटबाबत तर्कवितर्क लावू नका! BCCI ने स्पष्टच सांगितलं

Virat Kohli | X/BCCI