Sameer Panditrao
‘हे क्रिकेट, मला पुन्हा एकदा संधी दे’ अशी करुण नायरने केलेली भावनिक साद काही काळापूर्वी चर्चेचा विषय ठरली होती.
त्यानंतर त्याला दुसऱ्यांदा भारतीय संघात स्थान मिळाले खरे; परंतु तो त्या संधीचे सोने करू शकला नाही.
त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या आगामी चौथ्या कसोटीत त्याला वगळले जाण्याची शक्यता अधिक आहे.
लॉर्ड्सवरील तिसरी कसोटी भारत जिंकू शकला असता; परंतु काही किरकोळ चुका महाग ठरल्या.
आता चौथ्या कसोटीसाठी आठवड्याचा अवकाश असून, करुण नायरऐवजी साई सुदर्शनला संधी देण्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
करुण नायर हा वीरेंद्र सेहवागनंतर कसोटीत त्रिशतक करणारा भारताचा दुसरा फलंदाज ठरला होता; मात्र त्यानंतरही त्याला संघातून वगळण्यात आले होते.
तब्बल आठ वर्षांनंतर त्याला पुन्हा संघात पुनरागमनाची संधी मिळाली; पण सहा डावांमध्ये एकही ठोस खेळी न करता तो अपयशी ठरला.