Pranali Kodre
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात नोव्हेंबर-डिसेंबर 2023 टी20 मालिका पार पडली. या टी20 मालिकेत भारताने 4-1 अशा फरकाने विजय मिळवला.
या मालिकेनंतर ऑस्ट्रेलियाने भारताचा 2023 वर्षात अखेरचा निरोप घेतला.
ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबर 2023 मध्ये भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी त्यांनी सप्टेंबरच्या अखेरीस 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली होती. त्यामध्ये भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता.
या मालिकेनंतर भारतातच झालेल्या वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत पाचव्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घातली.
वर्ल्डकप 2023 नंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात लगेचच टी20 मालिका झाली, जी भारताने जिंकली. या मालिकनंतर 2023 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिस्पर्धा संपली.
विशेष म्हणजे 2023 वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलिया अनेकदा आमने-सामने आले होते. फेब्रुवारी 2023 मध्येही ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर आले होते.
त्यावेळी फेब्रुवारी-मार्चदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात 4 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही स्पर्धा झाली, ज्यात भारताने 2-1 अशा फरकाने विजय मिळवला होता.
बॉर्डर- गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेनंतर लगेचच मार्चमध्ये वनडे मालिका झाली, जी ऑस्ट्रेलियाने २-१ अशा फरकाने जिंकली होती.
विशेष म्हणजे जून 2023 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनमधील द ओव्हलवर टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेचा अंतिम सामनाही झाला, ज्यात ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवला.
अखेर आता 2023 वर्षातील भारत-ऑस्ट्रेलिया या दोन संघातील फेब्रुवारीमध्ये सुरू झालेली प्रतिस्पर्धा स्पर्धा डिसेंबरमध्ये संपली आहे.