Pranali Kodre
6 डिसेंबर रोजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक खेळाडूंचे वाढदिवस असतात. यातून आख्खा 11 जणांचा एक संघही तयार होऊ शकतो. आपणही 6 डिसेंबर रोजी वाढदिवस असणाऱ्या अशा 11 खेळाडूंवर नजर टाकू ज्यांचा एक संघ तयार होऊ शकतो.
करुण नायर हा भारताचा विरेंद्र सेहवागनंतरचा कसोटीतील दुसराच त्रिशतकवीर आहे.
पाकिस्तानचा फलंदाज नासिर जमशेदने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 60 हून अधिक सामन्यांत 1800 हून अधिक धावा केल्या आहेत.
भारताच्या या फलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3500 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
आयर्लंडचा फलंदाज हॅरि टेक्टरने 100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांत 2800 हून अधिक धावा केल्या आहेत आणि 9 विकेट्स घेतल्यात.
न्यूझीलंडचा यष्टीरक्षक ग्लेन फिलिप्स टी20 क्रिकेटमधील एक उत्तम फलंदाज असून त्याने या प्रकारात आंतरराष्ट्रीय स्तरावर 2 शतकेही केली आहेत.
इंग्लंडचा दिग्गज कर्णधार अँड्र्यू फ्लिंटॉफने त्याच्या अष्टपैलू खेळाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने 200 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामन्यांत 4000 हून अधिक धावा आणि 400 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा धाकड अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाने भारताकडून 290 हून अधिक सामने खेळले असून त्याच्या नावावर 5 हजारांपेक्षा अधिक धावा आणि 500 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा माजी वेगवान गोलंदाज आरपी सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 80 हून अधिक सामने खेळले असून 120 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
झिम्बाब्वेचा अष्टपैलू सीन इर्विनने 42 वनडे आणि 5 कसोटी सामने खेळताना 50 विकेट्स घेतल्या आहेत, तसेच 800 हून अधिक धावा केल्या.
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भारताचे तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्व करताना 150 हून अधिक सामने खेळले असून 200 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.
झिम्बाब्वेचे गोलंदाज माल्कम जार्विस यांनी 53 प्रथम श्रेणी सामने आणि 56 लिस्ट ए सामने खेळले. त्याने प्रथम श्रेणीमध्ये 29 च्या सरासरीने 163 विकेट्स घेतल्या, तर लिस्ट ए मध्ये 59 विकेट्स घेतल्या.