IND vs AFG: T20I मालिकेतील सामनावीर अन् मालिकावीर पुरस्काराचे मानकरी

Pranali Kodre

भारत विरुद्ध अफगाणिस्तान

भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात 11 ते 17 जानेवारी 2024 दरम्यान तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवण्यात आली होती.

India vs Afghanistan | X/BCCI

भारताचा मालिका विजय

या मालिकेतील तिन्ही सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवत अफगाणिस्तानला 3-0 असा व्हाइटवॉश दिला.

Team India | PTI

मालिकावीर

दरम्यान, या मालिकेत अष्टपैलू कामगिरी केलला शिवम दुबे मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Shivam Dube | X/BCCI

शिवम दुबेची कामगिरी

शिवमने या मालिकेत दोन अर्धशतकांसह सर्वाधिक 124 धावा केल्या. तसेच 2 विकेट्स घेतल्या.

Shivam Dube | PTI

पहिल्या सामन्यातील सामनावीर

या टी20 मालिकेतील पहिला सामना मोहालीला झाला होता. या सामन्यातही सामनावीर पुरस्कार शिवम दुबेलाच मिळाला होता. त्याने या सामन्यात नाबाद 60 धावांची खेळी केली होती. तसेच 1 विकेट घेतली होती.

Shivam Dube | PTI

दुसऱ्या सामन्यातील सामनावीर

तसेच 14 जानेवारी रोजी इंदूरला झालेल्या सामन्यात भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने या सामन्यात 4 षटकात 17 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

Axar Patel | X/BCCI

तिसऱ्या सामन्यातील सामनावीर

बंगळुरूला 17 जानेवारीला झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात नाबाद 121 धावांची शतकी खेळी करणारा रोहित शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

Rohit Sharma | PTI

Rohit Sharma: हिटमॅनचे बंगळुरूत विश्वविक्रमी T20I शतक

Rohit Sharma | X/BCCI