भारताचा नवा रेकॉर्ड! RBI ने सोन्याची केली विक्रमी खरेदी

Manish Jadhav

गुंतवणूक

सोन्यातील गुंतवणूक नेहमीच सुरक्षित आणि विश्वासार्ह मानली जाते. भारतात ही एक सामान्य गोष्ट आहे. बहुतांश महिलांनी सोने खरेदी करण्यात रस दाखवला आहे.

Gold | Dainik Gomantak

सोने खरेदी

जगात जेव्हा जेव्हा मंदी येते तेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सोन्याची खरेदी वाढवते.

Gold | Dainik Gomantak

रेकॉर्ड

RBI ने नोव्हेंबर 2024 मध्ये 8 टन सोने खरेदी करुन नवीन विक्रम केला आहे. यासह भारताचा एकूण सोन्याचा साठा 876 टनांवर पोहोचला आहे. भारताचा सोन्याचा साठा सध्या सरासरीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.

Gold

महागाई

महागाईच्या काळात सोने खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या चांगले मानले जाते. जेव्हा जगात आर्थिक अस्थिरतेचा काळ असतो तेव्हा सोने हे सुरक्षित गुंतवणूक मानले जाते. जागतिक किंवा स्थानिक आर्थिक संकटाच्या काळात सोन्याच्या किमती वाढतात.

Gold

फायदेशीर

जेव्हा बाजार अस्थिर असतात आणि इक्विटी मार्केटमध्ये अनिश्चितता असते तेव्हा सोने खरेदी करणे फायदेशीर व्यवहार मानले जाते.

Gold

भारत दुसऱ्या स्थानी

2024 मध्ये आरबीआयने मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली आहे. यावर्षी RBI ने सोने खरेदीत नॅशनल बँक ऑफ पोलंड (NBP) नंतर दुसरे स्थान मिळवले आहे.

Gold

सोन्याचा वाटा

भारत सोन्याची खरेदी करुन सोन्याचा साठा वेगाने वाढवत आहे. आरबीआयने केलेली ही खरेदी सोने हा केवळ गुंतवणुकीचा विश्वसनीय स्रोत नसून देशाच्या आर्थिक सुरक्षेचा आधार असल्याचे दर्शवते.

Gold
आणखी बघा